TestimonialsOUR ACHIVEMENTS

2600

Students

5

Home Labs

33

Workshops

2

Centres

Card image cap
2 months ago -

This is demo Blog

Choose the perfect design

Create a beautiful blog that fits your style. Choose from a selection of easy-to-use templates – all with flexible layouts and hundreds of background images – or design something new.

Read More
Card image cap
2 months ago -

Archimedes

एका दगडात अनेक पक्षी!

एका गरीब माणसाला देव प्रसन्न झाला. गरीब माणसाने देवापुढे आपली जीर्ण झालेली झोळी पसरली. “मला ही झोळी भरून सोन्याच्या मोहरा दे, म्हणजे माझी गरीबी दूर होईल,” माणूस देवाला म्हणाला. “ठीक आहे! देतो! पण त्या सोन्याच्या मोहरांना जेव्हा मातीचा स्पर्श होईल तेव्हा मोहरांचीही माती होईल.” देवाने माणसाला अट घातली आणि त्याच्या जीर्ण झोळीत मोहरा भरायला सुरवात केली. झोळी गच्च भरली, तशी देवाने हात आखडता घेतला. पण गरीब माणसाने कळकळीने विनंती केली, देवा आणखी एकच मोहर दे ना! देवाने त्याच्या झोळीत आणखी एक मोहर घातली. देवा आता अजून एकच दे, गरीब माणसाची हाव वाढली. झोळीची अवस्था पाहून देवाला आता त्यात आणखी काही घालावंस वाटेना. गरीब माणसाने फारच आग्रह केला म्हणून देवाने त्याच्या झोळीत एक मोहर घातली मात्र, आणि झोळी फाटून साऱ्या मोहरा मातीत विखुरल्या.

आम्ही शाळेत असतांना आमच्या इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकात हा धडा होता. त्यानंतर एक दोन वर्षानंतरच्या इयत्तेत, विज्ञानाच्या पुस्तकात आम्ही अणुविखंडनाविषयी अभ्यास केला. त्यात युरेनियम मूलद्रव्याच्या काही अणूंच्या केंद्रकात एक एवढासा चिमुकला न्यूट्रॉन घातला तर आधीचं मूलकणांनी गच्च भरलेला युरेनियमचा अणु फुटून त्यातले मूलकण कसे विखुरले जातात, ही विखंडनाची प्रक्रिया वाचून पुन्हा ती गरीब माणसाची झोळी आठवली. अर्थात गोष्टीतल्या मोहरांची माती होते, तसं न घडता अणु विखंडनातून प्रचंड उर्जा बाहेर पडते. पण एका मोहरेने झोळी फाटली तसंच एका मूलकणाने अणु फुटतो, हे साम्य इथे महत्त्वाचं! ज्या इयत्तेमध्ये, विज्ञानात अणुविखंडन शिकवलं त्याचं वर्षी तो इंग्रजीचा धडा असला असता, तर शिक्षकांना त्या दोन्हीची सांगड घालत, विखंडनाची संकल्पना स्पष्ट करायला अधिक मजा आली असती आणि हातासरशी इंग्रजीचा धडाही शिकवून झाला असता. सर्वात मुख्य म्हणजे दोन विषय वेगवेगळे शिकवण्याचा वेळही वाचला असता.

बऱ्याच वेळा, “संकल्पना कश्या आणि किती स्पष्ट करत रहाणार, आधी आमचा आहे तोच ‘पोर्शन’ दिलेल्या तासात शिकवून पूर्ण होत नाही,” अशी एक तक्रार नेहमी आपल्या कानावर येते. त्यावर खरं तर हा नामी उपाय आहे. एखादी संकल्पना विविध विषयांशी निगडीत असू शकते. तेव्हा ती शिकवतांना, आपसूकच ते ते विषय हाताळता येतात. त्यासाठी प्रत्येक विषयाचा वेगवेगळा ‘तास’ असण्याची आणि तो विषय वेगवगेळ्या व्यक्तींनी वेगवेगळ्या प्रकारे शिकवण्याची गरजच नाही.

वानगीदाखल इथे एक ‘बुडणे आणि तरंगणे’ याविषयावर निबंध दिला आहे. आता आधी तो निबंध वाचूया आणि मग त्यात सामावलेले अनेक विषय शोधूया.

‘एकच वस्तू कधी तरंगते तर कधी बुडते. आता हेच पहा, पाण्यात पडलेली साबणाची वडी लगेच बुडून साफ तळाला जाते. साबणाची वडी ठेवायचा प्लास्टिकचा स्टँड मात्र पाण्यावर तरंगतो.. त्यातचं आणखी एक गमतीदार गोष्ट म्हणजे साबणाची वडी स्टँडवर ठेवून, ती जोडी अलगद पाण्यात सोडली तर मात्र एरवी बुडणारा साबण आता त्या स्टँडसोबत तरंगत रहातो. या बुडण्या-तरंगण्याचा संबंध त्या त्या पदार्थांच्या घनतेशी असतो.

ज्या वस्तूची घनता पाण्यापेक्षा जास्त असते ती वस्तू पाण्यात बुडते आणि ज्या वस्तूची घनता कमी ती वस्तू पाण्यावर तरंगते. मग मिठासारखा एखादा पदार्थ विरघळवून पाणी जरा दाट केलं म्हणजेच पाण्याची घनता वाढवली तर एरवी पाण्यात बुडणारा पदार्थ पाण्यावर तरंगायला हवा, असा तर्क आणि त्यासंबंधित काही प्रयोगही आपल्याला सहज करून पाहता येतात. असाच काहीसा प्रयोग आर्कीमिडीजने करून पहिला होता. आणि नवीन शोध लागला म्हणून ‘दिगंबर’ अवस्थेत बाथरूममधून बाहेर पडून ‘युरेका युरेका’ म्हणत तो म्हणे धावत सुटला होता.

राजाच्या मुकुटाच्या सोन्यामध्ये, सोनाराने किती प्रमाणात चांदी मिसळली आहे ते शोधण्याची जबाबदरी आर्किमिडीजवर सोपवली गेली होती. मुकुटाला जराही नुकसान न पोचवता, आर्किमिडीजने मुकुट पाण्यात घातला. आणि मग सोनं, चांदी, पाणी यांच्या घनतांची सरळ सोपी गणितं करून त्याने राजाच्या प्रश्नाचं अचूक उत्तर शोधलं होतं.

एवढासा लोखंडाचा तुकडा पाण्यात टाकला तर तो बुडतो. पण लोखंडाचं कित्येक टनी वजनाचं जहाज मात्र पाण्यावर स्वार होऊन मैलोनमैलाचा प्रवास करतं. वजन जास्त असलं तरी जहाजाच्या विशिष्ट आकारामुळे जहाजाच्या आणि पाण्याच्या घनतेचं योग्य ते समीकरण साधलं जातं. सहाजिकच जहाज पाण्यावर अलगद तरंगतं. बरं आपण जहाजामध्ये भरपूर ओझंही भरत असतो. इथेही आर्किमिडीजने केला तसा गणिताचा वापर करून किती वजनाच्या जहाजात किती सामान भरायचं ते ठरवता येतं. पण ज्या बंदरात जहाज भरलं जातं तिथल्या समुद्राच्या खाऱ्या पाण्याची घनता आणि समुद्रातल्या ज्या मार्गाने ते प्रवास करतं, त्या साऱ्या प्रवासातल्या समुद्रांची वेगवेगळ्या ठिकाणाची घनता ही भौगोलिक परिस्थितीही लक्षात घ्यावी लागते. नाहीतर ते तरंगणारं अति विशाल जहाज आतल्या सर्व सामानासकट बुडून, एखाद्या समुद्राच्या रसातळाला पोहोचण्याची शक्यताच जास्त! तर असा हा बुडण्या-तरंगण्याचा महिमा!!’

हा निबंध जर आपण नीट वाचला तर आपल्या लक्षात येईल, की बुडणं आणि तरंगणं ह्या एका संकल्पनेच्या निमित्ताने अनेक विषय हाताळता आले. बुडते, बुडणे, बुडून, बुडण्या, बुडणारा, बुडतो, या शब्दांच्या मागचं व्याकरण, निबंधात वापरलेले उलट किंवा समानार्थी शब्द, वाक्यांच्या रचना, असा सर्व मराठी भाषेचा अभ्यास; तर्कशास्त्राची मदत घेत विज्ञान; वस्तू तरंगेल की नाही हे समजण्यासाठी करायचं साधं त्रैराशिक गणित; आर्किमिडीजच्या गोष्टीच्या अनुषंगाने येणारा इतिहास; जहाजांच्या समुद्रातल्या प्रवासांच्या, बंदरांच्या निमित्ताने भूगोल अश्या अनेक विषयांमधल्या संकल्पनांचा अभ्यास एकाच संकल्पनेभोवती गुंफता येतो.

शालेय शिक्षण हे असंच असायला हवं. अभ्यासक्रम तयार करतांनाच तो वेगवेगळ्या विषयांना एकत्र गुंफत रचलेला हवा. तसंच तो मागच्या पुढच्या इयत्तांशीही संबंधित हवा. समजा, तसा तो नसला तरीही अभ्यासक्रम तयार करणाऱ्याला दोष देत बसण्यापेक्षा, सर्व वर्गाच्या आणि सर्व विषयांच्या शिक्षकांनी एकत्र बसून चर्चा करून, आहे तोच अभ्यासक्रम, एकमेकांशी निगडीत करत, दिलेल्या वेळाच्याही आधी दिलेला ‘पोर्शन’ कसा पुरा करता येईल..... आणि नुसता पुरा करता येईल असं नव्हे तर ‘परिणामकारक’रित्या कसा पुरा करता येईल याची आखणी करायला हवी, आणि तशी ती सहजच करता येईल. तशी इच्छा मात्र असायला हवी. सध्याच्या काळात एकाच दगडात अनेक पक्षी मारता यायलाच हवेत.

डॉ. मानसी राजाध्यक्ष  

Read More
Card image cap
2 months ago -

Valuable metal

‘मौल्यवान’ धातू

रुथेनियम, ऱ्होडीयम, पॅलॅडीयम, चांदी, ऑस्मियम, इरिडियम, प्लॅटीनम आणि सोनं ह्या आठ धातूंना ‘मौल्यवान’ धातू म्हटलं जातं. पण मुळात ‘मौल्यवान’ धातू असं नामकरण या धातूंना करण्यामागचं कारण काय बरं असू शकेल? कोणी म्हणेल याचं कारण अगदी सोप्पं आहे. पृथ्वीवर ज्यांचा साठा कमी असतो, असे धातू सहाजिकच दुर्मिळ आणि म्हणूनच ते मौल्यवान ठरतात. दुसरं कोणी म्हणेल कदाचित या धातूंची खनिजं दुर्मिळ असतील; शिवाय खनिजांपासून शुध्द धातू मिळवण्याची प्रक्रियाही खर्चिक असेल आणि त्यामुळे वाढणारी त्यांची किंमत त्यांना मौल्यवान ठरवत असेल. पण तसं असेल तर असे अनेक दुर्मिळ धातू जगात आहेत, त्यांनीही मौल्यवान धातूंच्या पंगतीत असायला हवं, पण सर्वांनाच तो मान नाही. बरं शुध्द धातू मिळवण्याची प्रक्रिया गुंतागुंतीची आणि खर्च वाढवणारी म्हणावी तर आता तंत्रज्ञान एवढं विकसित झालंय की खनिजापासून शुध्द धातू मिळवण्यासाठी पूर्वीइतका वेळ आणि पैसे लागत नाहीत. तरीही या मौल्यवान धातूंची किंमत वाढतेच आहे आणि त्यांचं मौल्यवान हे पद सार्थ करते आहे. आता असाही प्रश्न येतो की दुर्मिळ खनिज असलेले अनेक धातू जगात आहेत पण त्यांना मौल्यवान म्हटलं जात नाही, हे जर खर असेल तर मग रुथेनियम, ऱ्होडीयम, पॅलॅडीयम, चांदी, ऑस्मियम, इरिडियम, प्लॅटीनम आणि सोनं ह्या आठ धातूंना ‘मौल्यवान’ धातू का म्हटलं जातं?

रसायनशास्त्राच्या दृष्टीने ‘मौल्यवान’ हा सन्मान प्राप्त होण्यासाठी धातूंमध्ये काही खास गुणधर्म असावे लागतात. धातू दिसायला चकचकीत देखणे असावेत हा गुणधर्म तर हवाच त्याशिवाय धातू लवचिक हवा. एखाद्या धातूची जेवढी बारीक तार काढता येईल तेवढा तो मह्त्त्वाचा ठरतो. याच गुणधर्माला धातूची लवचिकता असं समजतात.

शिवाय इतर धातूंपेक्षा, मौल्यवान धातू खूप जास्त तापमानाला उकळतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मौल्यवान धातू इतर धातुंच्या तुलनेत कमी क्रियाशील असतात. दमट हवेशी जरासा संपर्क आला की लोखंड गंजून जातं, म्हणजेच त्याचं ऑक्साईड तयार होतं. ही रासायनिक अभिक्रिया जलद आणि सहजपणे होते. पण मौल्यवान धातू इतक्या सहजपणे रासायनिक अभिक्रिया करत नाहीत.  या आणि अश्या अनेक इतर गुणधर्मांमुळे या आठ धातूंचा अनेक जीवनोपयोगी गोष्टींमध्ये मोठ्या प्रमाणात वापर करता येतो. म्हणून ह्या आठ धातूंच्या गटाला ‘मौल्यवान धातू’ असं म्हणतात.   

Read More